कोरोना नियंत्रणासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवा-सीईओ टाकसाळे

कोविड १९ च्या आजारावर नियंत्रणासाठी त्रिसुत्रीचा वापर करण्याचे आदेश

कोरोना नियंत्रणासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवा-सीईओ टाकसाळे

परभणी : जिल्ह्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात पार पडली.

सदर आढावा बैठकीत नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवानंद टाकसाळे यांनी कडक शब्दात सूचना दिल्या. पुढे मार्गदर्शन करतांना टाकसाळे म्हणाले की, कोविड १९ च्या आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर वारंवार हात धुणे, मास्कचा नियमितपणे वापरणे व सामाजिक अंतर ठेवण्या सोबतच आरटीपीसीआर चाचण्या करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तशा सूचनाही वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांना दिल्या.

**ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे उपकेंद्रांना वितरण
**

जिल्ह्यासाठी पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण मान्यवरांच्या हस्ते उपकेंद्रांना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे,आरोग्य सभापती आनेराव, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव घुमरे, जिल्हा परिषद सदस्य गोविंद देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी निरस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिरसुलवार आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.