वाढीव वीज बिल, महावितरणने गांर्भीयाने लक्ष द्यावे अन्यथा

1 min read

वाढीव वीज बिल, महावितरणने गांर्भीयाने लक्ष द्यावे अन्यथा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: तालुक्यासह शहरातील वाढीव वीज बिल कमी करण्याच्या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने सोनपेठच्या महावितरण विभागास दिले आहे. सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,सोनपेठ तालुक्यासह शहरातील जनतेला वाढीव वीज बिलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच सर्व जनता कोरोनासारख्या भंयकर आजाराशी सामना करत असताना त्यांना आपले जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यातच मागील पाच महिन्यापासून पुर्ण व्यवहार ठप्प आहेत.
महावितरणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज बील येत आहे. ते जनता भरणार कसे?असा सवाल उपस्थित करत निवेदनातून पुढील मागण्या केल्या आहेत. युनिटनुसार वीज बिल देण्यात यावे, वीज बिल जमा करण्यासाठी कार्यालयात खिडकीची व्यवस्था करण्यात यावी, बील टप्या-टप्याने जमा करून पावती देण्यात यावी, ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात यावे, आदी मागण्यांकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष नंदकुशोर रोडे,मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार, शहाराध्यक्ष संदिप कांबळे,राजु माने,राम कांबळे,योगेश हांगे,दत्ता कांबळे,गजानन देशपांडे,भागवत खरात,राजु कुक्कडे,आजय सोनवणे,बापु कांबळे,गोविंद कोल्हे यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.