औरंगाबादमध्ये स्वातंत्र्यदिनी गोंधळ

'एमआयएम'ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे, ताफा अडविण्याचा प्रयत्न...

औरंगाबादमध्ये स्वातंत्र्यदिनी गोंधळ

औरंगाबाद : औरंगाबादेत रविवारी स्वातंत्र दिनी मुख्य शासकीय ध्वजावंदनाच्या कार्यक्रमाला विभागीय आयुक्तालयात जात असताना पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना एमआयएमच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले. येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविल्याचा निषेध करण्यासाठी हे झेंडे दाखवण्यात आले.

या प्रसंगी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, की कोणाच्या सांगण्यावरुन क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवले आहे. पालकमंत्र्यांनी फक्त निवडणुकीसाठी औरंगाबादेत यायचे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (दि.१४) फेसबुक लाईव्ह द्वारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविल्याच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. या प्रसंगी त्यांनी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींवर टीका केली. रविवारी पालकमंत्री ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जात असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.
yutyuyui
देसाईंच्या वाहनाकडे पळाला कार्यकर्ता...
औरंगाबाद येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपून बाहेर निघालेल्या पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या वाहनाकडे अचानक एक तरुण कार्यकर्ता पळाला. पोलिसांनी प्रसंगावधानता दाखवत त्याला पकडून बाजूला नेले. दिल्ली गेटच्या पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार रविवारी घडला. देसाई हे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून बाहेर निघाले असता एमआयएमचे कार्यकर्त्यांनी पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हलविल्याच्या निषेधार्थ त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यातच सदरील तरुण पालकमंत्र्यांच्या वाहनाकडे पळत होता. पोलिसांनी त्याला वेळीच अडवून बाजूला काढले.
kgkgk


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.