
भारतीय लष्कराने चीनला दणका दिला आहे. लडाख सीमेजवळ चीनी लष्करासोबत तणाव सुरु असताना भारतीय सैन्याने जबरदस्त पराक्रम केला आहे. गेल्या २० दिवसात भारतीय जवानांनी चीनी सीमेजवळील सहा नव्या टेकडयांवर कब्जा केला. मागर हिल, गुरुंग हिल, रेजांग ला, राचाना ला, मोखपारी आणि फिंगर 4 रिज लाइनवरील सर्वात उंच टेकड्यांवर भारतीय सैन्याने ताबा मिळवला आहे. टेकड्यांचे भौगोलीक महत्व पाहता याचा भारताला मोठा फायदा होणार आहे.