भारतीय हॉकीपटू मनदीपसिंग कोरोना पॉझिटिव्ह

1 min read

भारतीय हॉकीपटू मनदीपसिंग कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा संसर्ग होणारा तो सहावा राष्ट्रीय हॉकीपटू

भारतीय हॉकी संघाचा खेळाडू मनदीप सिंगची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा संसर्ग होणारा तो सहावा राष्ट्रीय हॉकीपटू आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) सोमवारी ही माहिती दिली. जालंधरच्या 25 वर्षांच्या मनदीपमध्ये या आजाराची लक्षणे दिसत नाहीत. बंगळुरूमध्ये त्याच्यासह इतर पाच खेळाडूंवर उपचार सुरू आहेत. 20 ऑगस्ट रोजी बेंगळूरूच्या साई सेंटर येथे राष्ट्रीय शिबिर सुरू होणार आहे.
साईच्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय हॉकी संघाचा सदस्य मनदीप सिंगची बेंगळुरूमधील साईच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरापूर्वी कोविड चाचणी (आरटी पीसीआर) केला असता पॉझिटिव्ह आली. साईंनी एका निवेदनात म्हटले आहे. मनदीप ला कोणतेही लक्षणे दिसत नाहीत.भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि इतर चार खेळाडू गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.