टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ दिसणार नवीन जर्सीत

टी २० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार

टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ दिसणार नवीन जर्सीत

मुंबई- टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नवी जर्सी प्रदर्शित केली आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा मेन इन ब्लू या ड्रेसकोडमध्ये दिसणार आहे. या जर्सीत ऑफिशियल किट प्रायोजक म्हणून एमपीएलचा लोगो आहे. या व्यतिरिक्त टीम इंडियाचा प्रायोजक म्हणून बायजूसचाही लोगो आहे. केएल राहुल, संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा नव्या जर्सीत दिसत आहेत.

टीम इंडिया १८ ऑक्टोबरला आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. या दिवशी टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. टी २० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.