भारताची ऐतिहासिक कामगिरी, लसीचे १०० कोटी डोस पुर्ण

लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा

भारताची ऐतिहासिक कामगिरी, लसीचे १०० कोटी डोस पुर्ण

नवी दिल्लीः भारताने कोविड -१९ विरूद्ध लसीकरणात एक मोठा टप्पा गाठला आहे .आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा १०० कोटी डोसचा आकडा पार केला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील दिली आहे. चीननंतर भारत १०० कोटी डोस देणारा दुसरा देश बनला आहे.

देशात कोरोनाच्या लसीकरणाला १६ जानेवारी २०१२ रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज १०० कोटी डोस पूर्ण झाले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.

भारतात कोविड -१९ लसीचे १०० कोटी डोस आहेत, याचा अर्थ काय?
एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. लहारिया म्हणतात की सुमारे ३०० दशलक्ष प्रौढांना पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे. त्याच वेळी, ४०० दशलक्ष प्रौढ फक्त एकच डोस घेऊ शकले आहेत. १०० कोटी डोसचा आकडा उत्साहवर्धक आहे. यानंतरही, कोणीही विसरू शकत नाही की सुमारे २३-२४ कोटी प्रौढ आहेत ज्यांनी एक डोस देखील घेतला नाही. याचे कारण जाणून घेणे फार महत्वाचे आहे. एक चतुर्थांश लोक लसीकरण करण्यास नाखूष आहेत. त्यांचे प्रतिबंध मोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, लोकांना दुसरा डोस मिळत नसल्याच्या बातम्या आहेत, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. लोकांना समजावून सांगावे लागेल की जेव्हा दोन्ही डोस लागू केले जातात तेव्हाच संपूर्ण संरक्षण उपलब्ध होईल.

१०० कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा
देशातील लसीकरणाच्या १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचे यश साजरे करण्यासाठी गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केले जात आहे. आता हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे. या थीम साँगबद्दल बोलताना गायक कैलास खेर म्हणाले की, "लसीबाबत देशातील अनेक नागरिकांमध्ये अजूनही निरक्षरता आणि चुकीची माहिती आहे. या थीम साँगच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल." तसेच देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतल्या सीएसएमटीला रोषणाई करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.