राॅबर्ट वाड्राची आयकर विभागाकडून चौकशी

आयकर विभागाकडून करचुकवेगिरीबाबत वाड्रा यांची चौकशी.

राॅबर्ट वाड्राची आयकर विभागाकडून चौकशी

स्वप्नील कुमावत/नवी दिल्ली : आयकर विभागाकडून करचुकवेगिरीबाबत प्रियंका गांधी यांचे पती राॅबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाबही आयकर अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतला असून आपण कोणताही कर चुकवलेला नाही. आपल्याकडे बेनामी संपत्ती नाही. आयकर विभागाला आपण पूर्ण सहकार्य केले असून त्यांच्या प्रत्येक प्रश्न किंवा शंकांना उत्तर दिली आहेत. लवकरच सत्य समोर येईल, असे वाड़्रा यांनी सांगितले.

आपण कोणतीही कर चोरी केलेला नाही. आपल्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही. आयकर विभागाची नोटीस मिळाल्यापासून आपण आयकर अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली आहे, सरकारने राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे, असा आरोप रॉबर्ट वाड्रा यांनी सरकारवर केला.

ads


ज्या ज्या वेळी प्रियंका शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारतात किंवा अन्य मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरते त्या त्या वेळी आयकर विभागासारख्या खात्यांकडून आपली चौकशी केली जाते. आपण आतापर्यंत सर्व शासकीय विभागांना सहकार्य करत आलो आहोत, असेही रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.