INS विराट अखेरच्या प्रवासाला निघाली.

1 min read

INS विराट अखेरच्या प्रवासाला निघाली.

INS विराट भारतीय नौदलाच्या शक्तीत सिंहांचा वाटा होता. INS विराटला 'ग्रॅंड ओल्ड लेडी' असही म्हटलं जायचं.

मुंबई- INS विराट भारतीय विमानवाहू युद्धनौका अखेरच्या प्रवासाला निघाली आहे. या युद्धनौकेने जवळ जवळ तीन दशकांहून, अधिक काळ सेवेत राहिल्यानंतर ती २०१७ मध्ये निवृत्त झाली. आता ती गुजरातच्या अलंगमध्ये मोडीत काढली जाणार आहे. या युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या शक्तीत सिंहांचा वाटा होता. INS विराटला 'ग्रॅंड ओल्ड लेडी' म्हटलं जायचं.
ins
या अगोदर या युद्धनौकेने भारतीय नौदलाशिवाय २७ वर्ष UK च्या रॉयल नेव्हीची सेवा केली होती. तेव्हा तिचं नाव 'HMS हरमीझ' होतं. नौदल उभारणीसाठी भारताने ब्रिटनकडून ती १९८७ साली विकत घेतली. आता INS विराटच्या जागी विक्रमादित्य भारतीय नौदलाच्या सेवेत आहे. या‌ युद्धनौकेची लांबी २२६ मीटर आणि रुंदी ४९ मीटर होती. विराट या संस्कृत शब्दाचा अर्थ 'प्रचंड' असा होतो