बस स्थानकावरील सुविधांची आ.राहुल पाटील यांच्याकडून पाहणी

बस स्थानकावरील सुविधांची आ.राहुल पाटील यांच्याकडून पाहणी

परभणी : शहरातील बसस्थानकातील नव्या बसपोर्टचे काम सुरू असून या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपातील बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. परंतु याठिकाणी सुविधांचा अभाव आहे. या बाबत अनेक तक्रारी आल्याने शनिवारी आ. डॉ.राहुल पाटील यांनी बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या सुविधा तात्काळ पुरवाव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नवीन बसपोर्टच्या बांधकामाची देखील त्यांनी पाहणी केली.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पावसामुळे परभणी बसस्थानक तथा स्थानकाबाहेर साचलेल्या पाण्याचीही पाहणी करण्यात आली. तसेच परभणी येथे होऊ घातलेल्या नूतन बसस्थानकाच्या इमारतीतच्या बांधकामाचा आढावाही त्यांनी घेतला. महत्त्वाचे म्हणजे बसस्थानक परिसरात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा करण्यात यावा, नागरिकांना होणार्‍या गैरसोयी दूर कराव्यात, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, डेपो मॅनेजर दयानंद पाटील, राष्ट्रीय महामार्ग मार्गाचे अभियंता रुद्रवार, मनपा अभियंता वसीम खान, शिवसेनेचे उपशहरप्रमुख संभानाथ काळे, मारुती तिथे, नगरसेवक प्रशांत ठाकूर, विभाग प्रमुख उद्धव मोहिते, ऋषिकेश सावंत यांच्यासह पदाधिकारी ॲटोरिक्षा चालक तथा प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.