कोरोनामुळे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणारा आयपीएलचा हंगाम यावर्षी सप्टेंबर मध्ये सुरू होतोय. भारताबाहेर पहिल्यादांच आयपीएल होत आहे. आजपासून संपूर्ण जग आयपीएलमध्ये रंगणार आहे. बंद स्टेडियमवर कोणत्याही प्रेक्षकविना हा हंगाम प्रथमच खेळला जाईल. क्रिकेटला धर्म मानणारा भारत 13 व्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे.19 सप्टेंबरपासून ड्रीम 11 आयपीएल 2020 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जशी या दोन संघात सामना होईल.
सामना कोठे खेळला जाईल?
अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना होईल.
सामना किती वाजता सुरू होणार?
हे प्रथमच रात्री 8 च्या ऐवजी सायंकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल, म्हणजेच नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
कोणत्या चॅनेलवर ते प्रसारित होईल?
आयपीएलचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर केले जाईल. इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, कन्नड, तमिळ यासह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्याचे कव्हरेज असेल.
इथे बघू शकता लाईव्ह.
स्टार स्पोर्ट्स व्यतिरिक्त, डिज्नी हॉटस्टार व्हीआयपी वर सामन्यांचे थेट प्रक्षेपण देखील केले जाईल.
IPL: आजपासून आयपीएलचा 'महासंग्राम' सुरू, मुंबई-चेन्नई आमने-सामने.
प्रथमच बंद स्टेडियमवर कोणत्याही प्रेक्षकविना हा हंगाम खेळला जाईल.

Loading...