आषाढी वारी यावर्षीतरी पायी करता येईल का?

मंत्रीमंडळाची पुढील बैठक ही मंगळवारी किंवा बुधवारी असेल आणि त्याच बैठकीत यासंदर्भातला अंतिम निर्णय होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली.

आषाढी वारी यावर्षीतरी पायी करता येईल का?

आशय येडगे/औरंगाबाद: आशय येडगे/औरंगाबाद: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यंदाच्या आषाढी वारी संदर्भात अजून कुठलाही निर्णय झालेला नसून येणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.


आषाढी वारीतील पालखी सोहळ्याच्या पदाधिकार्‍यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली. या बैठकीतीन पालखी पदाधिकार्‍यांनी यावर्षी कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी वारी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली.
मागील वर्षी कोरोनामुळे इतकी वर्षे अखंड चालू असलेल्या पायी वारीला खंड पडला. केवळ काही
निवडक पदाधिकारी आणि वारकऱ्यांना वारीमध्ये सहभागी होता आले होते. एसटी महामंडळाच्या ‘विठाई’ या बस मधून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरात गेल्या होत्या आणि अत्यंत साधेपणाने आषाढी वारीचे सोपस्कार केले गेले होते. मागील वर्षी वारीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक माणसाची कोरोंनाची चाचणी केली गेली होती.


याच पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीबद्दल माहिती देताना अजित पवार अस म्हणाले , “आजच्या बैठकीत वारकरी संप्रदायातील मान्यवरांना बोलविण्यात आलेल होत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत कमीत कमी लोकांना घेऊन पायी वारी काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि तशी परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी वारकरी प्रतींनिधींनी केली.” याचबरोबर “तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या कानावर ही गोष्ट घालावी आणि त्यांचा निर्णय आम्हाला कळवा.” असे सुद्धा वारकरी म्हणाले.


अजित पवार असदेखील म्हणाले की वारीची परवानगी मिळाल्यास वारीमध्ये इतर लोक सहभागी होणार नाहीत त्याचबरोबर कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील असे आश्वासन पालखी पदाधिकार्‍यांनी दिले आहे. पण वारीमध्ये फक्त वारकरीच नाही तर इतरही घटक सहभागी होत असतात त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


मंत्रीमंडळाची पुढील बैठक ही मंगळवारी किंवा बुधवारी असेल आणि त्याच बैठकीत यासंदर्भातला अंतिम निर्णय होईल अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.