ठाकरे सरकारविरोधात मनसे आक्रमक, वरुण सरदेसाई 'सरकारी भाचा'आहे का?

महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे मोकाट सुटलेल्या सरकारी भाच्यासाठी मनसेचे महत्त्वाचे ८ सवाल.

ठाकरे सरकारविरोधात मनसे आक्रमक, वरुण सरदेसाई 'सरकारी भाचा'आहे का?

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री व सरकारमधील इतर जबाबदार मंत्री वारंवार कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नियम पाळण्याबाबत व राजकीय कार्यक्रमात, लग्न समारंभात गर्दी टाळण्याचे उपदेश, सल्ले देताना दिसून येत आहेत. पण सरकारमधल्या पक्षांचेच नेते जर ह्या उपदेशांना वाटाण्याच्या अक्षता दाखवणार असतील तर इतरांवर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार शासनाला उरतो का? तसंच ह्याच सत्ताधारी पक्षातील नेते जर नियम धाब्यावर बसवणार असतील तर इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तीची अपेक्षा सरकार कशी करू शकते? ही बेशिस्ती महाराष्ट्राला परवडणारी आहे का? असा सवाल मनसेचे अखिल चित्रे यांनी केला आहे.

युवासेनेचे पदाधिकारी मेळावे घेतले जात आहेत, त्यात शक्ती प्रदर्शनासाठी गर्दी जमवली जाते जाहे. कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवून वरूण सरदेसाई मेळाव्यांचं बिनदिक्कत आयोजन करत आहेत. समाजमाध्यमांमार्फत त्याचे फोटो व्हायरल केले जात आहेत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नियम मोडण्यास उद्युक्त केले जात आहे. आणि तरीही वरूण सरदेसाई ह्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही? त्यांना शासकीय पाहुणा ह्या धर्तीवर 'सरकारी भाचा' घोषित केले आहे का? असा सणसणित टोला चित्रे यांनी लागवला आहे.

महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे मोकाट सुटलेल्या सरकारी भाच्यासाठी आमचे महत्त्वाचे ८ सवाल.

  • तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता वरुण सरदेसाई मेळावे

  • घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितो?

  • मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणार्या आंदोलनांवर बंदी असताना कोणतेही शारीरिक अंतराचे नियम न पाळता 'सरकारी भाचा कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो? सरकारी आदेशांचे उल्लंघन केलं म्हणून श्री. वरुण सरदेसाई ह्यांच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये?

  • जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर असे मेळावे होणार असतील तर सरदेसाई ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये? "जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार' आणि 'मी जबाबदार' असं .

  • म्हणून जनतेवर कोरोना महासाथीचं खापर फोडणारं सरकार 'सरकारी भाच्या' वर इतकं मेहेरबान का ? कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत मग अगदी तो व्यक्ती आपल्या नातेसंबंधांतला का असेना... मग वारंवार छत्रपती शिवरायांचं नाव घेणार हे सरकार 'बेशिस्त भाच्याचा बंदोबस्त कधी करणार?

  • मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बसणारा हा 'सरकारी भाचा' कोरोना नियमांना किंबहुना सरकारलाच जुमानत

  • नाही का? सरकारला नातेवाईकांमधून कुणी आवाहन देत आहे का ?

  • राजकीय हेव्यादाव्यांसाठीही सरकारी भाच्याकडून आंदोलन करताना गर्दी जमवली जाते, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते. महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का?

  • ह्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नसतील तर सरकार ह्या अंतर्गत बेबंदशाहीपुढे हतबल आहे किंवा काहींना झुकते माफ देत आहे असा निष्कर्ष काढून आम्ही ह्या बेशिस्त वर्तवणुकी विरोधात कायदेशीर (न्यायालीन) लढाईसाठी सज्ज आहोत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.