महाराष्ट्राचे राज्यपाल हे 'राज्यपाल' नसुन भाजपचे नेते आहेत का?

राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?

महाराष्ट्राचे राज्यपाल हे 'राज्यपाल' नसुन भाजपचे नेते आहेत का?

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात राज्यपाल तळिये व चिपळूणला भेट देणार आहेत. राज्यपाल्यांच्या या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीने जोरदार निशाणा साधला आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या सोबत भाजपचे आमदार आशिष शेलार देखील आहेत. त्यावरून आ. अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ‘राज्यपाल महोदय आज आशिष शेलार यांना तळीये गावात सोबत घेऊन का गेले असावेत?. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही राज्याचे आहात की भाजपचे, ते तरी सांगुन टाका एकदा, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. महामहिम राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत की भाजपाचे याबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम आहे. गरज नसताना आशिष शेलार यांना सोबत नेणे हे राज्यपाल शिष्टाचारात बसणारे नाही. राज्यपालांनी घटनेचा अभ्यास करून स्वतः अधिकार समजून घ्यावेत, असा सल्ला देखील मिटकरी यांनी राज्यपालांना दिला आहे.

दरम्यान, पाच दिवसांपुर्वी तळीये गावात दरड कोसळून ३५ घरं जमिनदोस्त झाली होती. त्यात एकूण ८० जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली होती. तर ३२ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावाचं पुनर्वसन करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.