न्युज लेटर मधून ओकली गरळ
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसीसचे बरळणे सुरूच आहे. सर्व जगावर अधिराज्य गाजवू पाहणा-या युध्दखोर देशांना कोरोनाची लागन अल्लाच्या आदेशाने झाली असल्याचे इसीस ने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. सर्व मुर्तीपुजक देशात कोरोना होऊ दे अशी बददुवा द्यायला देखील इसीसवाले विसरले नाहीत.
अल्लाहने स्वतः निर्माण केलेल्या देशात देखील कोरोना पाठवला असल्याचे इसीसच्या म्युज लेटरमध्ये म्हटले आहे. महत्वाची बाब म्हणजे हिंदू आणि ख्रिश्चन आणि बोध्द राष्ट्रासोबत इराण, पाकिस्तान आणि अफगानीस्तान सारख्या देशाला कोरोनाने विळखा घातला आहे.
अल्लाह त्याला विरोध करणा-याना दंड देईल आणि त्याचे समर्थन करणा-यांना वाचवेल असे सांगताना मुर्तीपुजा करणा-या सर्वच राष्ट्रांना अल्लाहची ही सजा असल्याचे म्हटले आहे.