इस्रोने (ISRO) गाठला नवा टप्पा, एकाच वेळी 10 उपग्रहांसह सॅटेलाईट यशस्वी लाँच

1 min read

इस्रोने (ISRO) गाठला नवा टप्पा, एकाच वेळी 10 उपग्रहांसह सॅटेलाईट यशस्वी लाँच

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून हे प्रक्षेपण झाले.

नवी दिल्ली :  भारताच्या PSLV-C49 या क्षेपणास्त्राने 10 उपग्रहांसह (सॅटेलाईट) इस्रोने यशस्वी लाँचिंग केले. आज दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी 10 उपग्रहांसह सॅटेलाईटचे यशस्वी लाँचिंग करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून हे प्रक्षेपण झाले. आधी हे लाँचिंग दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार होते, मात्र नंतर यात सुधारणा करुन 3 वाजून 12 मिनिटांनी लाँचिंग झाले. या प्रक्षेपणाचे ‘काऊंड डाऊन’ शुक्रवारी (6 नोव्हेंबर) दुपारी रॉकेट लाँचिंगसाठी 26 तासांचे काऊंट डाऊन सुरु झाले होते.PSLVC49 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सुरुवातीला EOS01 हा उपग्रह चौथ्या टप्प्यात यशस्वीपणे क्षेपणास्त्रापासून वेगळा झाला आणि अंतराळ कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आला. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर 9 उपग्रह देखील यशस्वीपणे वेगळे होऊन आपआपल्या कक्षेत स्थिरावले. अशाप्रकारे या मोहिमेत इस्रोचा एक आणि अन्य 9 अशा एकूण 10 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण झाले.