'ये पब्लिक है, सब जानती है’- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचा सोनिया गांधीना पत्र

'ये पब्लिक है, सब जानती है’- देवेंद्र फडणवीस

नागपूरः माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवल आहे. त्यात त्यांनीमहाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्र पाठवले होते.सोनिया गांधींना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, अगदी १३ मे रोजीच्या आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण कोरोना रूग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे २२ टक्के आहे, जे सातत्याने ३० टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ३१ टक्के, तर सक्रिय रूग्णांचे सुद्धा १४ टक्के आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल.असे फडणवीस म्हणाले.

स्थानिक सत्ताधारी आणि काही माध्यमं मुंबईलाच महाराष्ट्र समजत असल्याचा टोलाही फडणवीसांनी या पत्रातून लगावला. मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली असून, मृतांचा आकडा हा सातत्याने आणि जाणिवपूर्वकपणे लपवला जात असल्याचा मुद्दा त्यांनी या पत्रातून अधोरेखित केला. राज्यात कोरोनाचा कहर वाढत असतानाच काँग्रेसही एक भाग असणाऱी सत्ताधारी महाविकासआघाडी मात्र नागरिकांना कोणत्याही प्रकारे मदत करत नाहीये, ही बाब अतिशय वेदनादायी असल्याचे म्हणत. फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या व्यवस्थापनाबाबत नाराजीचा सूर आळवला.

आज संपूर्ण जग मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहते आहे. त्यामुळे जगातील अनेक देश मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. भारतीय वॅक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करताना दिसून येतो. खरे तर वॅक्सिनचे उत्पादन वाढते आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात २०० कोटी वॅक्सिन उपलब्ध होणार आहेत. अर्थात भारतीय वॅक्सिनबाबतीत काँग्रेसचा विश्वास वाढतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना ‘ये पब्लिक है, सब जानती है’ याचे स्मरण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी करून दिले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.