आरोग्यासाठी फणस गुणकारी

फणस वजन कमी करण्यास मदत करतो

आरोग्यासाठी फणस गुणकारी

सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असे फळ किंवा अशी भाजी आहे. ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीत. फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह यांचा फणसात मोठय़ा प्रमाणात समावेश असतो. फणसामध्ये काही असे गुण आहेत. ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊया.

फणस खाल्याणे होणारे फायदे

  • फणसाची पाने स्वच्छ साफ करून सुकवल्यानंतर पानांचे चूर्ण तयार करा. त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात.

  • तोंड आल्यास फणसाची कच्ची पाने चावून थुंकल्याने तोंडाचे विकार कमी होतात.
    फणसाच्या कोवळ्या पानांना बारीक करून त्यापासून लहान - लहान गोळ्या तयार करा. त्यामुळे गळ्याचे आजार कमी होतात.

  • पिकलेले फणस खाल्याणे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात.

  • दमा असलेल्या रूग्णांसाठी फणसाची मूळे फार गुणकारी असतात. फणसाच्या मुळांना उकळून, त्या पाण्याच्या सेवनाने दमा नियंत्रित राहण्यास मदत होतो.

  • जर तुम्ही थायरॉइडच्या समस्येचा सामना करत असाल, तर तुम्ही फणस सेवन करावे. फणसात कॉपर तत्व असतात, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीचा स्त्राव संतुलित राहतो.

  • फणसात असलेल्या मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात.

  • फणसाच्या बियांच्या पावडरमध्ये मध मिसळून लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात.

  • फणस आरोग्यासाठी असला, तरीही त्याचे तोटे देखील आहेत.

पिकलेल्या फणसामुळे कफ होतो, त्यामुळे सर्दी-खोकला, अजीर्ण इत्यादी आजार तसेच गर्भवती स्त्रियांनी फणसचे सेवन करू नये. तसेच फणस सेवन केल्यावर, पान खाण्यामुळे पोट फुगते. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर पान खाऊ नये


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.