जालना कोरोनाग्रस्ताचा आकडा 200 च्या वर, 5 जणांचा मृत्यू

1 min read

जालना कोरोनाग्रस्ताचा आकडा 200 च्या वर, 5 जणांचा मृत्यू

स्वप्नील कुमावत/जालना:शहरातील पाच संशयीत रुग्णांचे अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने. जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 205 वर गेली आहे. शहरातील लक्ष्मीनारायनपुरा भागातील कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या महिलेच्या संपर्कातील पाच संशयीत रुग्णांचे अहवाल रविवारी सांयकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात लक्ष्मीनारायनपुरा भागातील 4 आणि गुडला गल्ली भागातील 1 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनामुळे आजपर्यंत जालना जिल्ह्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच रविवारी एकूण 11 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून आज पर्यंत एकुण 97 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 103 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जुना जालना भागातील एका खाजगी रुग्णालयातील 6 कर्मचा-यांसह जालना तालुक्यातील नूतनवाडी येथील 2, अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव 1, जालना शहरातील 1 आणि मंठा तालुक्यातील 1 अशा 11 जणांचा समावेश आहे.