जालना जिल्ह्यात आज 26 नविन कोरोनाबाधित रुग्ण, एकूण संख्या 350 वर

1 min read

जालना जिल्ह्यात आज 26 नविन कोरोनाबाधित रुग्ण, एकूण संख्या 350 वर

दि. 18 जून रोजी 55 रुग्णांचे नमूने तपासणी साठी पाठवले होते. 26 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 21 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

जालना/ दि 19 जून : जिल्हात काळ 55 रुग्णांचे नमूने तपासणी साठी पाठवले होते. त्यापैकी 26 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 21 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 350 इतकी झाली आहे. आता पर्यंत 221 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहे. तर सध्या 119 रुग्णावर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील 8 रुग्णांचे अहवाल प्रयोगशाळाकडे प्रलंबित आहे.

कालपर्यंत एकूण बाधित रूग्ण संख्या- 324
काल पाठवलेले नमूने- 55
आज अहवाल वेळेपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या- 26 (25 जालना शहर,1 टेंभूर्णी जाफराबाद)
आज अहवाल वेळेपर्यंत निगेटिव्ह रुग्ण संख्या- 21
आज अहवाल वेळेपर्यंत प्रलंबित नमूने- 8
एकूण बाधित रुग्ण संख्या- 350
एकूण डिस्चार्ज रुग्ण- 221
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्ण- 10
एकूण उपचार सुरु असलेले रुग्ण- 119