जालन्यातील नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात- अनिल देशमुख

1 min read

जालन्यातील नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात- अनिल देशमुख

जालन्यात एकतर्फी प्रेमातून नवविवाहितेची 30 जून रोजी हत्या झाली होती. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

जालना : जिल्ह्यातील मंठा इथल्या नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असं आश्वासनही गृहमंत्र्यांनी ट्वीट द्वारे दिल आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा येथे पाच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका विवाहित तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. वैष्णवी गोरे (वय 19) असे या मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी मंठा शहरातील बाजार पेठेत मृत तरुणी आपल्या आईसह खरेदीसाठी गेली होती. साधारण चार वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या आरोपीने धारदार चाकूने हल्ला करत तरुणीचा गळा चिरला. बेसावध असलेली तरुणी जागीच कोसळली तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. याआधी हिंगणघाट येथे महिलेल्या भर रस्तात जाळून टाकल्याची घटना घडली होती. आता अशीच घटना पुन्हा घडल्याने राज्यात महिला सुरक्षितता विषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत महिलेवरील होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

WhatsApp-Image-2020-07-04-at-13.53.12

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी तपास सुरु केला. प्रत्यक्षदर्शींच्या महितीनुसार, मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तिच्याच घराजवळ राहणाऱ्या शेख अल्ताफ शेख बाबू या 26 वर्षाच्या तरुणाचे नाव पुढे आले. तरुणाची माहिती घेऊन त्याची शोधाशोध सुरु केली. संध्याकाळी एका शेतात लपून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. सदर आरोपीच्या ताब्यातून एक चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान अटकेच्या भीतीने आरोपीने विष प्राशन केले असून त्याच्यावर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे होते.