जिन्सी पोलीसांचा गुटखा विक्रेत्यावर छापा.

1 min read

जिन्सी पोलीसांचा गुटखा विक्रेत्यावर छापा.

९० हजारांचा गुटखा जप्त

सुमित दंडुके/औरंगाबाद : दि.१५ .शहरात सर्रासपणे गुटखा विक्री करणाऱ्या शेख वाहेद शेख अफसर (वय.३४, रा.रहेमानीया कॉलोनी) याला जिन्सी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिन्सी पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांना सोबत घेऊन आरोपीच्या घरी छापा मारला असता त्याच्याकडून सुमारे ९० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यामुळे सदरील इसमाविरूद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते हे करीत आहे. सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि सहकाऱ्यानी पार पाडली.