जितेंद्र राऊतला बेदम चोप

1 min read

जितेंद्र राऊतला बेदम चोप

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्याबाबत फेसबुकवर सतत आक्षेपार्ह आणि घाणेरडे लिखाण करणाऱ्या जितेंद्र राऊत या एका सामाजिक संघटनेचे काम करणाऱ्या विदर्भातील व्यक्तीस शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला.
त्याच्या तोंडाला काळे फासून जून्या खेटराची माळ घालून त्याची पोलीस ठाण्या पर्यंत धिंड देखील काढली.
विशेष म्हणजे हे सगळे त्याच्याच फेसबुकवर लाईव्ह करण्यात आले
सतत सतत समज देऊन देखील जिंतेंद्र राऊतची आक्षेपार्ह भाषा चालूच होती. औरंगजेब आणि शाहिस्तेखान यांचा उल्लेख तो साहेब असा करायचा तर दोन्ही महाराजांचा उल्लेख मात्र एकेरी करायचा.
मुघल, आदिलशाही किंवा निजाम सरदार यांचा आदराने उल्लेख करणारा जितेंद्र शिवाजी महाराज यांचा उल्लेख मात्र अपमानजनक पद्धतीने करत होता.
ही बाब सतत सतत घडत होती
जातीवाचक पोस्ट आणि उल्लेख याने समाजात तेढ देखील निर्माण होत होते. अखेर कायदा हातात घेत तरुणांनी याला धडा शिकवला
कायद्याने काहीच केले नाही म्हणून शेवटी हा पवित्रा शिवप्रेमीनी घेतला. पोलीस किंवा न्याय व्यवस्थेने प्रतिबंध घातला असता तर ही घटना टळली असती