लातूर जिल्हा माहेश्वरी सभा व मनपाच्या संयुक्त लसीकरण

लातूर जिल्हात लसीची जनजागृती निर्माण व्हावी यासाठी माहेश्वरी सभेच्यावतीने महानगर पालिकेच्या सहकार्याने मोफत लसीकरण उपक्रम राबविण्यात आले

लातूर जिल्हा माहेश्वरी सभा व मनपाच्या संयुक्त लसीकरण

लातूर : समाजात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठीची उदासिनता दूर होवून लसीकरणाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्यावतीने महानगर पालिकेच्या सहकार्याने मोफत लसीकरण उपक्रम राबविण्यात आला. याचा माहेश्वरी समाजातील तब्बल ३०० जणांनी लाभ घेतला.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, डॉ. चेतन सारडा, वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल बिर्ला, लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड, सचिव फुलचंद काबरा, प्रोजेक्ट चेअरमन अमोल तापडिया, कोषाध्यक्ष गोविंद कोठारी,  बालकिशन मुंदडा, हुकूमचंद कलंत्री प्रकाश कासट, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी कार्यकारी  सदस्य गोकुळदास चांडक , मधुसूदन सोनी उपस्थित होते. या लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंंडे म्हणाले की, सद्यस्थिती कोरोनाचा भीषण प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण करणे हे खूप गरजेचे असून लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा लसीकरण उपक्रम कौतुकास्पद असून महानगर पालिकेला यामुळे मोठे सहकार्य आहे.

या उपक्रमासाठी पत्रकार सचिन चांडक, अनुराधा करवा, सरिता मुंदडा,  राजेश मंत्री, प्रल्हाद चांडक, अभिजित गिल्डा, शाम भट्टड, द्वारकादास बिदादा, दिपक बजाज, जगदिश लड्डा, श्रीराम बाहेती,  पवन काळे आदींनी परिश्रम घेतले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.