ज्यांना शेती आहे तो शेतकरी ही व्याख्या दंडसंहितेनुसार चूक

1 min read

ज्यांना शेती आहे तो शेतकरी ही व्याख्या दंडसंहितेनुसार चूक

मनसेच्या शेतकरी एल्गार परिषदेत अमर हबीब यांचे प्रतिपादन

ज्यांना शेती आहे तो शेतकरी ही व्याख्या दंडसंहितेनुसार चूक आहे कारण ज्याची उपजीविका शेतीवर आधारित तोच खरा शेतकरी असे प्रतिपादन किसांपुत्र आंदोलन प्रणेते अमर हबीब यांनी मनसेच्या शेतकरी एल्गार परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.उध्दवराव भिकाणे, मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाद्यक्ष संतोष नागरगोजे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे ,कार्यक्रमाचे आयोजक व मनसे जिल्हाध्यक्ष नरसिंग भिकाणे, सचिन भिकाणे, राजिव मोहगावकर आदिची उपस्थिती होती. गावचे प्रतिष्ठीत शेतकरी स्व.धोंडिराम भिकाणे यांना श्रध्दांजली अर्पित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
अमर हबीब म्हणाले की मोठेमोठे काळाबाजारी धनदांडगे लोक, नेतेमंडळी, यांना हिरव्यागार अनेक एकर शेती आहे म्हणून त्यांना शेतकरी म्हणता येत नाही कारण त्यांची उपजिवीका भागवण्यासाठीचे अनेक व्यवसाय चालू असतात म्हणून त्यांना शेतकरी म्हणता येत नाही. कारण ते शेतकरी या व्याख्येत बसत नाहीत. उलट अडीच एकर शेती असलेला शेतकरी देशात 85 टक्के आहे. याचे कारण शेतकरी विषयक जुलमी कायदे आहेत. ज्यात सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा असे अनेक कायदे आहेत जे शेतक-याला जगू ही देत नाहीत आणि मरू ही देत नाहीत.
कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्ये वरचा जुजबी इलाज – डॉ. भिकाणे
शेतकरी एल्गार परिषदेमुळे शेतक-याला आपल्या दुःखाचे मूळ हे जाचक शेतकरी विषयक कायद्यांमध्ये आहे हे समजले असून कर्जमाफी,कर्जमुक्ती ही फक्त शासनाची बनवाबनवी आहे. शेतकरी आत्महत्या बंद होण्यासाठी येत्या काळात शेतक-यांना सोबत घेऊन या जुलमी शेतकरी विरोधी कायद्यांविरुद्ध मी मोठा लढा उभारणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यश भिकाणे व आभारप्रदर्शन संतोष रोडगे यांनी केले.