कधी पाहिलीत का? श्रीमंतांची लाल द्राक्षे

1 min read

कधी पाहिलीत का? श्रीमंतांची लाल द्राक्षे

ही लाल द्राक्षे जास्त किंमतीमुळे श्रीमंतांचे फळ म्हणून ओळखले जाते.

तुम्ही कधी लाल द्राक्षे खाल्ली आहेत का? आता तुम्ही म्हणाल की लाल द्राक्षे कोठे खाल्ली जातील? द्राक्षे तर हिरवे किंवा काळे असतात. परंतु आज तुम्हाला सांगणार आहोत की, लाल द्राक्षे सुद्धा आहेत. हे द्राक्षे सहज सापडत नाहीत. विशेष म्हणजे याची एका घसाची किंमत आपल्याला आश्चर्यचकित करण्यासारखीच आहे.

जपानमधील लोक ७.५ लाख रुपयांमध्ये द्राक्षांचा एक घस खरेदी करीत आहेत. या द्राक्ष जातीचे नाव रुबी रोमन आहे. या विशिष्ट प्रजातीच्या द्राक्षाचे वजन सुमारे २० ग्रॅम असते. एका घसात सुमारे २४ द्राक्षे असतात. ही लाल द्राक्षे जास्त किंमतीमुळे श्रीमंतांचे फळ म्हणून ओळखले जाते. द्राक्षाची ही विशेष प्रजाती १२ वर्षांपूर्वी इशिकावा प्रांताच्या सरकारने विकसित केली होती.

हे द्राक्षे खायला खूप गोड लागतात. जपानमध्ये ही लाल द्राक्षे लक्झरी फळांच्या श्रेणीमध्ये येतात. येथे शुभ प्रसंगी भेट म्हणून ती दिली जातात. वास्तविक, ही द्राक्षे जपानमध्ये सहज मिळत नाही. म्हणूनच हे खूप महाग आहेत.

नुकतेच कनाजावाच्या थोक बाजारात या द्राक्षांसाठी विक्रमी बोली लावण्यात आली. लिलावात ह्याकुराकुसो नावाच्या कंपनीने द्राक्षांचा एक घस ११ हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ७.५२ लाख रुपयांना खरेदी केला. जपानमधील हॉटेल व्यवसायात या कंपनीचा सहभाग आहे. इशिकावा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे असे म्हणणे आहे की, ते सप्टेंबरपर्यंत रुबी रोमन जातीचे सुमारे २६ हजार घस निर्यात करतील.