कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात तीनही शाखेत मुलींची बाजी

1 min read

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात तीनही शाखेत मुलींची बाजी

विज्ञानमध्ये नवगीरे,वाणिज्यमध्ये भारती,कलामध्ये दळवे

सिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ:सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही यशाची परंपरा राखली असून तीनही शाखेत मुलींनी प्रथम येऊन कन्याराज निर्माण केले आहे.काल नुकताच बारावीचा निकाल लागला यात मुलींनी बाजी मारनल्याने एक आदर्श निर्माण झाला आहेच शिवाय वरपुडकर महाविद्यालयाने तालुक्यातून प्रथम क्रमांक येऊन १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.IMG-20200717-WA0003यावर्षी बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे.यात प्रथम साक्षी दशरथ नवगीरे हीने ८१%तर द्वितीय क्रमांक गौरी अनिल मोहिते ७८% व तृतीय क्रमांक वैष्णवी मुक्तेश्वर यादव ७६%या तीनही विद्यार्थीनीनी येऊन नवीन नावलौकीक मिळवला आहे.IMG-20200717-WA0004त्याचबरोबर कला शाखेचा निकालही ८४%लागला आहे यातही मुलींनी अनुक्रमें प्रथम,द्वितीय,तृतीय आलेल्या आहेत यात जाधव निकिता दत्तात्रय ७८% द्वितीय क्रमांक राठोड प्रियंका दिनाईक ७७%व तृतीय क्रमांक दळवे श्रद्धा रामेश्वर ७६%टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९८%लागला आहे यात प्रथम क्रमांक भारती अर्चना गणपत ८०% द्वितीय क्रमांक चव्हाण उर्मिला एकनाथ ७८%व तृतीय क्रमांक भोसले माधुरी उद्धवराव ७६%विशेष म्हणजे तीनही शाखेत प्रथम,द्वितीय,तृतीय येण्याचा बहुमान मुलींना मिळाल्याने एक नवीन आदर्श सोनपेठ तालुक्याने निर्माण केला आहे.IMG-20200717-WA0005यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर कदम,गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण,उपाध्यक्ष ज्योती कदम,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते,कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शेख शकीला,मार्गदर्शक डॉ.एम.बी.पाटील,प्रा. एस.व्ही रणखांंब
प्रा.एम.डी.मेहत्रे,प्रा.ए.एस.बोबडे,प्रा.एम.एम.गव्हाणे,प्रा.के.ए.आरबाड,प्रा.एस.डी.वाघमारे,प्रा.एस.जी.मोरे,प्रा.एस. एस.वडकर,प्रा.व्ही.एस.राठोड,प्रा.आर.बी.धोंडगे,प्रा.जे.पी. भोसले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.