9 तारखेला कंगना मुंबईत, केंद्राने दिली ‘Y’ पल्स श्रेणीची सुरक्षा

1 min read

9 तारखेला कंगना मुंबईत, केंद्राने दिली ‘Y’ पल्स श्रेणीची सुरक्षा

सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे मानले आभार. संजय राऊत,महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. त्यात 11 पोलिस व 2 कमांडोचा सामावेश असणार आहे. त्यावर तिने गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. कंगना म्हणाली की, परिस्थितीमुळे काही दिवसानंतर शहाने मला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला असता, परंतु त्यांनी भारताच्या मुलीचे शब्द पाळले.
'कोणताही फासीवादी कोणत्याही देशभक्त आवाजाला चिरडण्यास सक्षम होणार नाही याचा हा पुरावा आहे, अमित शहाजींचे मी आभारी आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे काही दिवसांनी त्यांनी मला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला असता, पण त्यांनी भारताच्या एका मुलीचे शब्द पाळले आहेत, त्यांनी आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान राखला, जय हिंद! आहे. ' कंगना 9 सप्टेंबर ला मुंबईत येत आहे.याच कारणाने तिला ही सुरक्षा देण्यात आली आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईचे वर्णन पाकव्यात कश्मीर केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगऩा रनौत मध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते, असे कंगनाने वादग्रस्त विधान केलं होत. यावर राऊत यांनी तिला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यानंतर कंगनाने आव्हान दिले की, ती 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. काल तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही.
कंगनाने मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे. तिला महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही, त्यांचे पालन केले जाईल. असे विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख केले होते.