कानपुर हत्याकांडातील आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक

1 min read

कानपुर हत्याकांडातील आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक

विकास दुबे आणि त्यांचा सांथीदारांना पकड्याला गेलेल्या पोलिसांवर केलेल्या फायरींग मध्ये 8 पोलिस अधिकारी शहिंद झाले होते. विकासला पकडण्यासाठी 2.5 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

नवी दिल्ली: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अखेर अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली आहे. 9 जुलै रोजी सकाळी पोलिसांनी एका एनकाऊंटरमध्ये विकास दुबेच्या दोन साथीदारांचा खात्मा केला होता. यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. हे दोघेही विकासचे अत्यंत जवळचे सहकारी होते. विकास दुबे तीन जुलैपासून फरार होता. त्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 50 हजारांचं बक्षीस जाहीर केलं होतं. नंतर ही रक्कम 2.5 लाख केली होती तर 8 जुलै रोजी त्याची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचा इनाम देण्यात य़ेईल, असं प्रशासनाने सांगितलं होतं. अखेर विकास दुबेला पोलिनी उज्जैनमधून अटक केली आहे.

उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. महाकाल मंदिराच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते. 3 जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चित्रपटाच्या कथानकासारखी घटना घडली होती. विकास दुबे आणि गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. शहीदांमध्ये एक डी वाय एस पी, तीन सबइन्सपेक्टर आणि चार हवालदारांचा समावेश होता.

kanpur-1

विकास दुबेच्या अटकेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ज्यांना वाटतं की महाकालला शरण आल्यावर त्यांची पापं धुतली जातील, त्यांनी महाकालला खऱ्या अर्थानं ओळखलंच नाहीय. आमचं सरकार कुठल्याही दोषींना सोडणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. हे दशकभरापुर्वी उत्तर प्रदेश-बिहर मध्ये राजरोस घडत असल्याची चर्चा होती. 21 व्या शतका दिवसाढवळ्या असे घडलं यावर लवकर विश्वास बसत नाही. उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे. पोलीस पोहचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले.

76866934

विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खुन, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती.