कर्जमाफीच्या आड शेतक-यांच्या दुस-या प्रश्राकडे दुर्लक्ष

1 min read

कर्जमाफीच्या आड शेतक-यांच्या दुस-या प्रश्राकडे दुर्लक्ष

अर्थसंकल्प नव्हे तर अर्थ ‘हिन’ संकल्प शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांची प्रतिक्रिया

लातूर : आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.पण या अर्थसंकल्पात शेतक-यांच्या प्रश्नाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे, सध्या हमीभावापेक्षा तुर धान्यात 1800 रूपयांचा हरभ-यांत 1500 रूपयांचा फरक आहे. फरकाची रक्कम देण्याची घोषणा अपेक्षित होते. पण ते देण्यासाठी या अर्थसंकल्पात कसलीच तरतुद केली गेली नाही. तर दुसरीकडे आमदारांच्या निधीत एक कोटी रूपयांची वाढीव तरतुद करण्यात आली आहे. अशी खंत देखील जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी व्यक्त केली.
तसेच या वर्षी नऊ जिल्ह्यात रब्बीचा पीक विमाच भरून घेतला गेला नाही. अवकाळीने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. या बाबतही काही दिले गेले नाही, एका बाजूला कर्ज माफित चालु बाकिदारांना 50 हजार रूपये बोनस तर दुस-या बाजूला थकबाकीदाराला दोन लाखावरील रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा की हा अर्थसंकल्प अर्थ ‘हिन’ आहे. अशा माहिती जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी दिली.