कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत घोषणा

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली होती, तर दुसरी यादी उदया शुक्रवारी जाहीर होणार आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे.

कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित केली आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नये. यामध्ये अचूकता यावी म्हणून टप्याने याद्या जाहीर करण्याचा उद्देश आहे.तसेच 28 फेब्रुवारी रोजी दुसरी यादी होईल अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.