कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

1 min read

कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

तहसिलदार डॉ.अशिषकुमार बिरादार, सहाय्यक निबंधक एस.व्ही.गिनगिने यांचे शेतक-यांना आवाहन

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ ची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात चालू असून या कर्जमुक्ती योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कर्जमाफी घेऊन कर्जमुक्त होण्याचा लाभ घेण्याचे आवाहन सोनपेठचे तहसिलदार डॉ.अशिषकुमार बिरादार, सहाय्यक निबंधक एस.व्ही.गिनगिने यांनी शेतकऱ्यांना केले आहे. सोनपेठ तालुक्यात कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी चालू असून या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांना कर्जमाफी योजनेची जनजागृती करत वंचित शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी आदेश दिलेले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांपर्यंत या आदेशाचे पालन झाले नसल्यास शेतकऱ्यांनी सदर आवाहनाच्या अनुषंगाने वंचित शेतकऱ्यांनी 7 ऑगस्टपर्यंत तालुक्यातील कोणत्याही महा-ई.सेवा केंद्रावर जाऊन आधार संलग्नीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.