करूणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ सप्टेंबरपर्यंत वाढ

करूणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ सप्टेंबरपर्यंत वाढ

बीड : जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा या न्यायालयीत कोठडीत असणार आहेत.करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या.

करुणा शर्मांच्या वकिलाचा आरोप
या सुनावणीवेळी तपास अधिकारी आणि फिर्यादी गैरहजर होते. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या वकिलाने पोलीस याप्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. आता 18 सप्टेंबरला करुणा शर्मा यांना जामीन मिळणार की नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.