‘कौन बनेगा करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘कौन बनेगा करोडपती' 13 व्या हंगामाची 23 ऑगस्टला सुरूवात

‘कौन बनेगा करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः ‘कौन बनेगा करोडपती' 13 व्या हंगामाची प्रतीक्षा अखेर संमपली. प्रत्येक नवीन सीझनची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. नेहमी प्रमाणे, यावेळी देखील, कौन बनेगा करोडपतीचा 13 वा सीझन मेगास्टार अमिताभ बच्चन होस्ट करताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या होस्टिंगमुळे शो नेहमीच आकर्षक बनतो. ‘कौन बनेगा करोडपती 13 व्या हंगामा 23 ऑगस्टला सुरू होणार आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ शोची ऑडिशन फेरी पूर्ण झाली असून आता शोच्या निर्मात्यांनी त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे. केबीसी 23 ऑगस्ट 2021 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. सोनीच्या वतीनं ट्विट करून याबाबत अधिकृत माहिती शेअर करण्यात आली आहे.नेहमीप्रमाणे या वर्षीही केबीसी आठवड्यात पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होईल. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रोमो शेअर करून संपूर्ण वेळापत्रक शेअर केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी केबीसी 13 चा प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत इस्टाग्रामवर कौन बनेगा करोडपती अर्थात KBC चा प्रोमो शेअर केला आणि सांगितले की, याचा 13वा सीझन लवकरच येणार आहे. प्रोमो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कमिंग बॅक .. ऑन केबीसी.’ त्यांनी पुढे लिहिले की, या प्रोमोचा भाग दोन लवकरच येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.