कधीच पाऊस पडत नाही या गावात

1 min read

कधीच पाऊस पडत नाही या गावात

येथे पर्वतांच्या शिखरावर बरीच सुंदर घरे बांधली गेलेली आहेत, ज्यांना लोक बघतच राहतात.

जगभरात एकापेक्षा एक असे काही ठिकाण असतात ज्यांचा इतिहास खरचं आश्चर्यचकीत करणारा असतो. जसे की, मेघालयाच्या मासिनराम गाव, जीथे जगभरात सर्वात जास्त पाऊस पडतो. परंतु कधी तुम्ही अशा एका ठिकाणा बद्दल ऐकले आहे की, जीथे कधीच पाऊस पडत नाही. विशेष म्हणजे हे एक गाव असून याठिकाणी लोकवस्ती देखील आहे.

अल-हुतैब नाव असलेले हे गाव यमनच्या राजधानीत वसलेले आहे. पर्यटक येथे वारंवार येतात आणि या नेत्रदीपक दृश्यांचा आनंद घेतात. एवढेच नाही तर येथे पर्वतांच्या शिखरावर बरीच सुंदर घरे बांधली गेलेली आहेत, ज्यांना लोक बघतच राहतात.

हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३२०० मीटर उंचीवर वसलेले आहे. गावाच्या आसपासचे वातावरण उबदार आहे. हिवाळ्यादरम्यान सकाळी वातावरण खूप थंड असते, परंतु जसे सुर्य उगवला की, लोकांना उन्हाचा तढाका सहन करवा लागतो.

ग्रामीण आणि शहरी वैशिष्ट्यांसह प्राचीन आणि आधुनिक वास्तुकला जोडणारे हे गाव आता 'अल-बोहरा किंवा अल-मुकर्मा' लोकांचा गढी आहे. त्यांना यमनी समुदाय म्हणतात.

या गावाचे सर्वात मोठे वैशिष्टय म्हणजे ढगांच्यावर असल्याने या गावात कधीच पाऊस पडत नाही.