मनसेचे 'खाली मुंडकं वर पाय' आंदोलन

1 min read

मनसेचे 'खाली मुंडकं वर पाय' आंदोलन

महावितरण व महाराष्ट्र शासनाचा निषेध..

लातूर : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले याचा फाटका महाराष्ट्र जनतेला बसला आहे. राज्यातील जनता आर्थिक अडचणीत आली असून त्या रोगाचा सामना करत असताना लोकांची आर्थिक बाजू नाजूक झालेली आहे. अश्या संकटाच्या काळात महावितरणने जनतेला दिलेले भरमसाठ वीज बिल हे न सोसणारे आहे पहिलेच जनतेच्या हाताला कसलेही  काम नसताना तीन महिनेच्या लॉकडाऊन काळात दिलेले वीज बिल  हा आंधळा कारभार निषेधानिय आहे.

महाराष्ट्र नव निर्माण सेनाने आंदोलना मार्फत शासनाचा निषेध केला. हे शासन जनतेच्या मूलभूत आडचणीकडे दुर्लक्ष करीत आहे. या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे च्या वतीने खाली मुंडकं वर पाय करून महावितरणाटचा निषेध केला आहे. तर  सरकारने या  संकटाच्या काळातील वीजबिल माफ  झालेच पाहिजे, सामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, असे बोलके फलक हातात घेऊन अनोखा आंदोलन करत शासनाचा व महावितरणाचा निषेध केला.

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करून जनतेला या महामारीच्या व संकटातून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आले. यावेळी मनसेचे शहर संघटक अँड.अजय कलशेट्टी, उपाध्यक्ष वैभव जाधव,राजाभाऊ शिंदे, गोविंद कांबळे,संतोष पतंगे,शिवा बदनाळे,सुनील जाधव,अजिंक्य रेड्डी,गोपाळ खंडागळे,शिवकरण नाटकर,मयूर साबणे आदी उपस्थित होते.