खानावळीत चालायचा पिण्याचा धंदा

1 min read

खानावळीत चालायचा पिण्याचा धंदा

संचारबंदीच्या काळात लोकांचा ड्राय डे ओला करणा-या खानावळ चालकाला जालना पोलीसांनी रंगेहात पकडले. शिवाय त्याच्याकडून मोठा दारूचा साठा देखील जप्त केला.

जालना - खानावळीच्या आडून चक्क दारू दुकान चालविणा-या हॉटेल चालकाला जालना पोलीसांनी मुद्देमालासकट अटक केली आहे. जीवनावश्यक गोष्टीच्या नावाखाली खानावळ उघडी ठेवण्याची परवानगी जालण्यातील एका हॉटेलचालकाला मिळाली. आणि त्याने जेवनाआधी थोडी मिळण्याची व्यवस्था देखील करून ठेवली.
जालण्यातील एका दारू दुकानदाराशी संगनमत करून या खानावळ चालकाने दारूची सोय करून ठेवली होती. जेवायला येणा-यांना किंवा पार्सल घेऊन जाणा-या मंडळींना ही सुविधा उपलब्ध होती. पण पोलीसांपर्यंत अखेर खबर गेलीच.अवैधरित्या विक्रीसाठी आणलेली १४ हजाराची देशी-विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. भोजनालयाचा मालक दिलीप श्रीरामवार (वय ४५,रा. बडी सडक जालना) हा एका दारू व्यापाऱ्यांशी संगनमत करून ही दारू विकण्याचा व्यवसाय करत होता.
बाजार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक योगेश चव्हाण, समाधान तेलंग्रे, बंटी ओहोळ, फुसे , फुलचंद गव्हाणे, ज्योती राठोड आदींनी ही कारवाई केली आहे.