खुलेआम हातभट्टी चालू

1 min read

खुलेआम हातभट्टी चालू

कोरोनामुळे दारूबंदी तर केली पण त्यावरचा उपाय म्हणून हातभट्टी जोरात सुरू आहे. केज तालुक्यातील (बीड) नांदूरघाट येथे भर रस्त्यावर दारू तयार केली जात आहे. आणि पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. अमोल जाधव यांनी हा व्हिडीओ उपलब्द्ध करून दिला आहे..

खुले आम हातभट्टीची दारू

कोरोनामुळे दारूबंदी तर केली पण त्यावरचा उपाय म्हणून हातभट्टी जोरात सुरू आहे. केज तालुक्यातील (बीड) नांदूरघाट येथे भर रस्त्यावर दारू तयार केली जात आहे. आणि पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
मागच्या अनेक दिवसापासून हा प्रकार सतत सुरू आहे. या परिसरातील लोकांनी या हातभट्टी करणा-या लोकांना समजावून सांगितले. पोलीसांच्या कडे तक्रार करून झाली पण हातभट्टी कांही बंद झाली नाही. पोलीस आणि या दारूवाल्यांचे साटोलोटे असल्याचा आरोप देखील येथील नागरिक करतात. हातभट्टीला वैतागलेल्या स्थानिक मंडळींनी कंटाळून अखेर चोरून व्हिडीओ घेतला. आता पोलीस ही दारू बंद करतात की आशीर्वाद चालूच ठेवतात हे बघावे लागेल. एनालायजरचे स्नेही अमोल जाधव यांनी हा व्हिडीओ उपलब्द्ध करून दिला आहे..