मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला

मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

मुंबई :लग्नास नकार दिल्याने मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. परंतू मालवीने लग्नास नकार दिल्याने मालवीवर या आरोपीने चाकू हल्ला केला आहे. मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी तीन-चार वेळा तो मालवीला भेटला होता. आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने मालवीची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने लग्नासाठी तिला प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने योगेश तिचा पाठलाग करत असे.

मालवीच्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. दोनच दिवसांपूर्वी मालवी दुबईहून परतली असता तिच्या बिल्डिंगखाली उभा होता. काल रात्री अंधेरीतील वर्सोवा भागात तो ऑडीने आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केल्याची माहिती आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.