जाणून घ्या, चिकन खाण्याचे फायदे

जाणून घ्या, चिकन खाण्याचे फायदे

तांबडा-पांढरा रस्सा ते अगदी चिकन सूप आणि सुके - ओले चिकन ते लॉलीपॉप.. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात चिकन-मटण बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुढील आठवड्यांत श्रावण सुरू होत असल्याने घराघरांत 'गटारी'ची तयारी सुरू झाली असेल. मांसाहार हा अनेकांच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. मग अशा मांसाहाराचे शरीराला होणारे फायदे जानुन घ्या.

चिकन खाण्याचे फायदे

प्रोटीन सप्लाय
चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

वजन कमी करण्यात होते मदत
सुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

हाडांची ताकद वाढते
प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असते. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाल्ल्याने शरीरात गाठी होण्याचा धोकाी कमी होतो.

तणावापासून मुक्ती
चिकनमध्ये ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी5 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हे शरीरातील तणाव कमी करण्यात मदत करते. चिकनमध्ये मॅग्नेशियमही असतं. यामुळे पीएमएसच्या लक्षणांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

चिकनमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. सूप स्वरुपात चिकन खाणे जास्त फायदेशीर आहे. सर्दी दूर करण्यासाठी चिकन सूप पिणं सर्वोत्तम मानले जाते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.