जाणून घ्या वसुबारसचे महत्व..!

1 min read

जाणून घ्या वसुबारसचे महत्व..!

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस पासून दिवाळीस सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारस ला फार महत्व आहे. वसुबारसलाच काही भागात गायीगोरस म्हटले जाते.

दिवाळीला आजपासून सुरूवात झाली. गाय आणि वासराच्या पूजेचे महत्व असणारा वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांमधील पहिला दिवस. पुर्वी घरोघरी गाय होत्या. मात्र सध्या शहरातील गायीची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी गाय-वासराच्या पुजेचे आयोजन केले जाते.
‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ धन असा होतो, वसुधा म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन म्हणजे एका अर्थाने दौलतच. या जमिनीतून धान्यरूपी धन प्राप्त होतं आणि ‘बारस’ हा शब्द द्वादशी या तिथीसाठी ग्रामीण भागात सर्रास वापरतात. बारस या शब्दात ‘पाडसं’ किंवा ‘वासरू’ शब्दाची किंचितसी छटा आहे. ‘वसुबारस’ म्हणजे सवत्सधेनु (गाय आणि वासरू) यांची पूजा करण्याचा दिवस. या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. वरील गाण्यात गाय-बैलाच्या रक्षणासाठी वाघाशी पंगा घेण्याची देखील तयारी दाखवली आहे. ती गोधनाच्या कृतज्ञतेपोटीच दुधदुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग व शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञता पूजा. गोठय़ातील गोधन, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढय़ा हीच शेतकऱ्याची खरी धनदौलत. या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस. दक्षिण कोकणात या दिवशी गोठय़ात शेणाच्या गवळणी व श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यांची पूजा केली जाते. विशेष म्हणजे या दिवशी घरातल्या स्त्रियांना गोठय़ातलं कोणतंही काम करण्याची परवानगी नसते. ही आपल्या ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला व त्याची कृतज्ञता म्हणून असे केले जात असावे हे निश्चित.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस पासून दिवाळीस सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारस ला फार महत्व आहे. वसुबारसलाच काही भागात गायीगोरस म्हटले जाते.