कोरोना प्यार हैः गर्लफ्रेमसोबत इटलीला गेला, आणि कोरोना झाला...

1 min read

कोरोना प्यार हैः गर्लफ्रेमसोबत इटलीला गेला, आणि कोरोना झाला...

ब्रिटनमधील एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत खोटं बोलून प्रेयसीसोबत इटलीला फिरायला गेला होता.

इंग्लंड मधील लंडनचा एक व्यक्ती आपल्या प्रियंसीबरोबर फिरायला इटलीला गेला होता. त्याला इटलीमध्ये कोरोनाची लागंन झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो आपल्या पत्नीला खोटं बोलून प्रेयसीबरोबर गेला होता. या व्यक्तीच्या पत्नीला आपला पती प्रेयसीसोबत इटली फिरायला गेला होता याची अजून कल्पना नाही. पतीने उद्योग संबंधित काम आहे असे सांगून आपल्या प्रेयसीसोबत इटली फिरण्यास गेला होता.

कोरोना झाल्यामुळे त्याला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या पत्नीला अजूनही महित नाही की, पतीला कोरोनाची लागण कशी झाली. कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर या व्यक्तीने इंग्लंडमधील पब्लिक हेल्थ कोऑर्डिनेटरमध्ये जाऊन इटलीवरुन आल्याचे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात चाचणी केल्यानंतर स्पष्ट झाले की या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

या व्यक्तीने रुग्णालयातील डॉक्टरला संगितले की, माझे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. ज्यावेळी प्रेमिकाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिचे नाव सांगण्यास त्याने नकार दिला. जेव्हा त्याच्या पत्नील हा प्रकार समजला तेव्हा मात्र तिने स्वतःला घरात आयसोलेशन करुन घेतले.

- स्वप्नील कुमावत