कोरोनाच्या भितीने बॉलिवूड स्टार्सही घरीच

1 min read

कोरोनाच्या भितीने बॉलिवूड स्टार्सही घरीच

बॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा खोलवर परिणाम होत आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले गेले तर चित्रपटाची रिलीज डेट पुढे गेली आहे.

कोरोना विषाणूचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येत आहे. एवढेच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा खोलवर परिणाम होत आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले गेले तर चित्रपटाची रिलीज डेट पुढे गेली आहे. पण कोरोनाने एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे चित्रपटाच्या कलाकारांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा दिलासा मिळाला. आता बॉलिवूड स्टार्स घरी आपला वेळ घालवत आहेत. चला तर जाणून घेऊया काही बॉलिवूड स्टार्सचा वेळ कसा जातोय.
दीपिका पादुकोण
कोरोनामुळे यावेळी सर्वात सुरक्षिततेचे ठिकाण कोणते समजले जात आहे तर ते म्हणजे आपले घर. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही तिच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ मिळाला आहे. दीपिका यावेळी आपला हा वेळ संपूर्णपणे घरीच घालवत आहे. दीपिकाने तिच्या कपड्यांचे एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सांगितले की या मोकळ्या वेळात ती आपल्या वॉर्डरोबची साफसफाई करण्यात व्यस्त आहे.
प्रियंका चोप्रा
कोरोनाच्या भीतीपोटी बॉलिवूडची देसी मुलगीही घरात लपलेली दिसते. प्रियांका या दिवसात आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. प्रियंकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे सांगितले आहे की ती सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. प्रियांकाने एक चित्र शेअर करत लिहिले की, 'घर या वेळी सर्वात सुरक्षित स्थान आहे. अशा परिस्थितीत गिनो द जर्मन मम्मीला मिठी मारणे सर्वात खास आहे. गिनो हा प्रियंकाचा पाळीव कुत्रा आहे.
सनी लिओनी
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी या दिवसात घरात राहून खूप कंटाळली आहे. तीने स्वतः असे सांगितले आहे. सनीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचे हावभाव पाहूनच वाटते की, ती किती कंटाळली आहे. तीने व्हिडिओला एक कॅप्शनही दिले आहे की, घरी राहून कंटाळा आलाय...
ट्विंकल खन्ना
अनिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाही कोरोनाच्या भितीने आपला वेळ घरीच घालवत आहे. तीने आपल्या मुलीसह एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये ट्विंकल आणि तीची मुलगी नितारा झोपून पुस्तक वाचण्याचा आनंद घेत आहे.