कोरोनाच्या संकटाला संधीत बदला – नरेंद्र मोदी

1 min read

कोरोनाच्या संकटाला संधीत बदला – नरेंद्र मोदी

जग एक विश्वासार्ह भागीदार शोधतंय, भारताकडे ती क्षमता, सामर्थ्य आहे

स्वप्नील कुमावत/नवी दिल्लीः जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगातील मोठ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट होत आहे. जग एक विश्वासार्ह भागीदार शोधतंय हिच संधी आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्याची. सरकारने आत्मनिर्भर होण्यासाठी 20 लाख कोटीचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाच्या संकटाला संधीत रुपांतरित करा. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ज्या क्षेत्रात आपण मागास आहोत. त्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याची ही संधी आहे. असेही पंतप्रधान म्हणाले. ते द इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या 95 व्या वार्षिक सत्रात बोलत होते.
भारत आत्मनिर्भर करायचा आहे. आत्मनिर्भरतेचा हा भाव प्रत्येक भारतीयांची कित्येक वर्षांपासूनची आकांक्षा आहे. मागील 5-6 वर्षात देशातील धोरणांमध्ये भारताला आत्मनिर्भर करणे हेच लक्ष्य मुख्य राहिले आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली. ती प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत. आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू हेदेखील पाहाव लागेल. लोकल ते व्होकल होण्याची हीच वेळ आहे. असेही मोदी म्हणाले.