कोश्यारीचे गुरु पवार? राऊतांची टीका!

1 min read

कोश्यारीचे गुरु पवार? राऊतांची टीका!

काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

पुणे: पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमाला संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे. भाजपचे लोकही पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही मानू लागले आहेत. त्यामुळे मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लावला आहे. यामुळे येत्या काळात भगतसिंह कोश्यारीचे गुरु शरद पवार होऊ शकतात.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर भेट घेतली असता राज्यपालांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. भाजपचे बहुतेक नेते पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असे असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.