सीईओ टाकसाळे यांच्याकडून कोविड रुग्णांची विचारपूस

शिवानंद टाकसाळे यांनी सोमवार रोजी परभणी येथील आयटीआय,अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय येथील कोविड सेंटरला भेटी देऊन बाधित रुग्णांची विचारपूस केल

सीईओ टाकसाळे  यांच्याकडून कोविड रुग्णांची विचारपूस

परभणी: जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या प्रादुर्भावाने बाधित झालेल्या रुग्णांना औषधोपचार व आरोग्य विषयक सुविधा व्यवस्थित आणि वेळेवर मिळत आहेत का याची खात्री करण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सोमवार रोजी परभणी येथील आयटीआय,अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय येथील कोविड सेंटरला भेटी देऊन बाधित रुग्णांची विचारपूस केली.

या भेटी दरम्यान कोविड कक्षामध्ये प्रवेश करुन रुग्णांना त्यांच्या तब्येतीची व अडचणींची विचारपुस केली. तसेच असुविधेबाबतही विचारणा केली. आहारामध्ये मिळणारे जेवण, त्याचा दर्जा व इतर आवश्यक असणाऱ्या सुविधाची माहिती रुग्णांकडुन घेतली. यावेळी आयटीआय सेंटरला डॉ.कदम यांच्यासह अधिपरिचारीका, वार्डबॉय, सफाईगार यांना सुचना देवून सुविधा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांना अडचण असल्यास दुरध्वनीवरुन संपर्क साधण्यासाठी आवाहन केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.