कृषी अधिकारीच अपडेट नाहीत

1 min read

कृषी अधिकारीच अपडेट नाहीत

अनभिज्ञता कालबाह्य झालेल्या किटकनाशक व खताची करताहेत शिफारस शेतकरी संघटनेचे नेते राजकुमार सस्तापुरे यांचा आरोप

लातूर: यावर्षी खरिप हंगामात सुरूवातीलाच सोयाबीन उगवले नसल्यामुळे दुबार,तिबार, पेरणी करुन कसेतरी सोयाबीनचे पिक आले असताना. आता सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा व खोडआळीचा प्रादुर्भावाच नवं संकट शेतक-यासमोर आले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे पुर्ण झाडे आपोआप सुकुन वाळुन जात आहेत यामुळे सध्या शेतकरी धास्तावलेल्या अवस्थेत आहेत.
या प्रादुर्भावाच्या नियत्रंणासाठी योग्य किटकनाशकांची गरज भासते म्हणून शेतकरी या बाबत कृषी अधिका-यांचा सल्ला घेत आहेत व अधिकारी मात्र या बाबतीत अपडेट न राहता जुन्या व कालबाह्य झालेल्या किटकनाशकांची शिफारस शेतक-यांना करीत आहेत.

शेतकरी संघटनेचे नेते राजकुमार सस्तापुरे

या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४०.ई.सी याची शिफारस करत आहेत पण हे किटकनाशक बाजारात कुठल्याही दुकानात उपलब्ध नाही, कारण या किटकनाशकांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे, याचे उत्पादन 31मार्च 2019 ला बंद करण्यात आले व उत्पादीत केलेल्या शिल्लक औषध 31मार्च 2020 पर्यंत संपवण्यात आले त्यामुळे ते औषध बाजारात मिळत नाही.
त्यामुळे या किटकनाशकाची मागणी कृषी दुकानदाराकडे शेतक-यांनी केली असता हे औषध बंद झाल्याचे सांगण्यात येते.
पण काही कृषी खात्याच्या आधिका-यांकडे हे किटकनाशक उपलब्ध आहे ते आपल्या एजेंट मार्फत विकत आहेत त्यामुळेच या किटकनाशकाची शिफारस करत आहेत आशी चर्चा ऐकायला मिळत आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजकुमार सस्तापुरे यांनी केला आहे.

तसेच बियाण्याला औषध लावण्यासाठी बुरशीनाशक औषधाची शिफारस केली पाहिजे पण "ग्योचो" हे किटकनाशक असतानाही याची शिफारस केली जात आहे.
खताबाबत स्वत कृषी अधिक्षक यांनी पेरणी पुर्वी फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातुन DAP येवजी 18.18.10. किंवा 20.20.0.या खताची शिफारस शेतक-यांना केली पण 18.18.10. च्या निर्मितीवरही बंदी आहे गेल्या चार वर्षापासुन हे खत बाजारात मिळत नाहीत तसेच 2 वर्षापासुन 20.20.0. मिळत नाही त्या जागी आता 20.20. साडे तेरा हे खत येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत अलिकडच्या काळात किटकनाशकाचा व खतांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे म्हणून ब-याच किटकनाशकांवर व खतावर बंदी घालण्यात आली आहे याबाबत कृषीधिकारी अपडेट न राहता शिफारस करत आहेत. म्हणजे मागचं पाट पुढचं सपाट असा प्रकार आहे किमान यापुढेतरी कृषी आधिकार-यांनी अपडेट राहावून शिफारस करावी. असे मत शेतकरी संघटनेचे नेते राजकुमार सस्तापुरे यांनी व्यक्त केले.