लातूरातील भाडेवाढीला स्थगीती

1 min read

लातूरातील भाडेवाढीला स्थगीती

लातूरातील गाळे भाडेवाढीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता गाळे धारकांना दिलासा मिळाला आहे

लातूर ( प्रतिनिधी)
लातूर शहर महानगर पालिकेच्या रेडीरेकनरव्दारे केलेल्या भाडेवाढीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने स्थगित दिली आहे. आता लातूर मनपाला भाडेकरू कडून रेडीरेकनर आधारे केलेली भाडेवाढ वसूल करता येणार नाही.
लातूर मनपावर कॉंग्रेसची सत्ता असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व्यंकट बेद्रे यांनीच एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. भाडेवाढी बाबत जैन कॉम्पलेक्स येथील विविध भाडेकरूनी जिल्हा न्यायालयात रेडीरेकनरव्दारे केलेल्या भाडेवाढी विरूध्द अपिल दाखल केले होते. परंतू हे अपिल जिल्हा न्यायालयाने फेटाळले होते. या निर्णयाविरूध्द संबंधीत भाडेकरूंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणामध्ये मा. उच्च न्यायालयाने लातूर महानगर पालिका ने रेडीरेकनरच्या आधारे दि. १० ऑक्टोबर चा आदेश स्थगीत करण्यात आला आहे. रोजीच्या भाडेवाढीचे आदेश स्थगीत करण्यात आलेले आहेत. मा. उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद न्यायालयामध्ये भाडेकरू / गाळेधारकाच्या वतिने हनमंत पाटील व अमोल भगत यांनी काम पाहिले,