९ नोव्हेंबरला येणार ‘लक्ष्मी’

1 min read

९ नोव्हेंबरला येणार ‘लक्ष्मी’

अक्षय कुमारचा शीर्षकामुळे अडचणीत आलेला ‘लक्ष्मी बाँब’ हा चित्रपट आता ‘लक्ष्मी’ या नावाने ९ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे.

मुंबई:अक्षय कुमारचा शीर्षकामुळे अडचणीत आलेला ‘लक्ष्मी बाँब’ हा चित्रपट आता ‘लक्ष्मी’ या नावाने ९ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे. नावामुळे प्रचंड वादंग झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेउन निर्माते शबिना खान, तुषार कपुर, अक्षय कुमार यांनी चित्रपटाचे शिर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या शिर्षकावरुन हिंदुच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अनेक संस्थानी केला आहे. त्यामुळे बॉम्ब हा शब्दच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
WhatsApp-Image-2020-11-01-at-1.50.14-PM
“लक्ष्मी” हा अँक्शन, हॉरर सोबत कॉमेडी चित्रपट आहे. साउथच्या कांचना चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटावर अभिनेता मुकेश खन्ना यांनीही नाराजी व्यक्त केली होती. पण आता बॉक्स ऑफिसवर काय जादु करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.