ऐतिहासिक निर्णयः “लालबागचा राजा” गणेशोत्सव रद्द

1 min read

ऐतिहासिक निर्णयः “लालबागचा राजा” गणेशोत्सव रद्द

गणेशोत्वसाच्या 11 दिवसात रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी यासारखे उपक्रम राबविले जाणार “लालबागचा राजा” गणेश मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबईः मुंबईतील जगप्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने घेतला आहे. देशातील कोरोना परिस्थितीत राज्यातील स्थिती सर्वात वाईट आहे. अशात लालबागचा राजा मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही तर केवळ आरोग्य उत्सव साजरा करणार आहे. गणेशोत्वसाच्या ११ दिवसांमध्ये या ठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यापूर्वी अनेक मंडळानी गणेशाच्या मूर्तीची उंची कमी करण्याचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. अशात गणेशोत्सवात गर्दी टाळणे शक्य नाही. त्यामुळेच लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ८७ वर्षापासून लालबागमध्ये गणेसोत्सवाची परंपरा आहे. केवळ मुंबई आणि देशातच नव्हे, तर परदेशातून सुद्धा भविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात.

lalabagcha-raja--1-

यंदा अनेक गणेश मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मुंबईचा राजाची २२ फुटांची मुर्ती स्थापित न करता ३ फुटांची मूर्ती स्थापित करण्याचा निर्णय घेतला.
  • परळचा राजा गणेश मंडळाने गणेशाची मुर्ती २३ फुटांची न ठेवता ३ फुटांची करण्याचा निर्णय घेतला.
  • १०१ वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेश मंडळाने गणेशाची मूर्ती मंडपातच घडविण्याचा निर्णय घेतला.